‘निसान’च्या देशांतर्गत विक्रीत ४५ टक्क्यांची वाढ
‘निसान’च्या देशांतर्गत विक्रीत ४५ टक्क्यांची वाढ
गुरूग्राम, ता. ४ : निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमआयपीएल) ऑक्टोबर २०२५मध्ये ९,६७५ युनिट्सची एकत्रित विक्री नोंदवली. यामध्ये मासिक तत्त्वावर त्याच्या उत्पादन विक्रीत ४५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळीदरम्यान नवीन निसान मॅग्नाइटच्या मागणी मोठी वाढ दिसून आली. त्यातच सरकारने जीएसटी दरात कपात केल्याने विक्रीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, की देशांतर्गत घाऊक विक्री २,४०२ युनिट्सवर पोहोचली. नवीन निसान मॅग्नाइटची मागणी वाढत असून तिची निर्यात ७,२७३ युनिट्सवर पोहोचली. त्यामुळे जागतिक निर्यात केंद्र म्हणून निसान इंडियाचे स्थान बळकट झाले. कंपनीने अलीकडेच त्यांच्या १२ लाखाव्या वाहनाच्या निर्यातीचा उत्सव साजरा केला. त्यातच निसान मोटार ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ तत्त्वज्ञानाशी वचनबद्ध आहे. दरम्यान, ग्राहकांना जीएसटीचा संपूर्ण लाभ देऊन निसानने न्यू निसान मॅग्नाइटच्या किमती एक लाख रुपयांपर्यंत कमी केल्या. न्यू निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन आणि नवीन मेटॅलिक ग्रे बाजारात दाखल झाल्या आहेत. देशभरातील ग्राहकांकडून त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.

