कामोठ्यातील नागरिकांचे पाण्याविना हाल

कामोठ्यातील नागरिकांचे पाण्याविना हाल

Published on

कामोठ्यातील नागरिकांचे पाण्याविना हाल
कामोठे, ता. ४ (बातमीदार) ः भोकरपाडा जलवाहिनी दुरुस्तीसाठी नवी मुंबई महापालिकेने मंगळवार, बुधवारी कामोठे नोडचा पाणीपुरवठा बंदचे नियोजन केल्यामुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्ती कामामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने मंगळवार (ता. ४), बुधवारी (ता. ५) कामोठे आणि खारघर नोडमधील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. गुरुवारी (ता. ६) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कामोठे नोडला दैनंदिन ४२ एमएलडी पाण्याची गरज आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. मंगळवारी पाणीपुरवठा बंद असल्याने कामोठे नोडमधील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. खासगी टँकरने पाणी विकत घेऊन घरातील दैनंदिन कामकाज उरकावे लागले. गृहिणींचे घरकामाचे, नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर जाणाऱ्यांचे वेळापत्रक बिघडले. मोठ्या गृहनिर्माण संस्थांनी टँकरच्या विकतच्या पाण्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन केला.
..................
कोट ः नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा देण्याचे सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. कामोठ्यात दैनंदिन ८० टँकरची मागणी आहे. साधारण ४० टँकर पाणीपुरवठा होतो. सिडको वाहतूक शुल्क आकारत नाही. सरासरी १२५ रुपये प्रति टँकर इतके नाममात्र शुल्क आकारले जात आहे.
- प्रफुल्ल देवरे, पाणीपुरवठा अधिकारी, सिडको- कामोठे
...........
प्रतिक्रिया ः पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर निर्भर राहावे लागत आहे. गृहनिर्माण संस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सिडको व पनवेल महानगरपालिकेने पाणीटंचाई दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- सुरेश सडोलीकर, वृंदावन पार्क सेक्टर ३४, कामोठे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com