डिसिजन युअर करिअर कार्यशाळेचे आयोजन...

डिसिजन युअर करिअर कार्यशाळेचे आयोजन...

Published on

डिसिजन युअर करिअर कार्यशाळेचे आयोजन
विद्यार्थ्यांमध्ये करिअर नियोजन, आत्मविश्वास व सर्जनशीलतेचा जागर
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्टारसीड्स प्लेसमेंट्स अँड ट्रेनिंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने डीझाइन युअर करिअर या प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन गुरुवार (ता. ७) आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले होते. ही विशेषतः कार्यशाळा दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती.
यामध्ये मास्टर ट्रेनर नील वन्हाडपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत करिअर निवड, उद्दिष्ट निश्चिती आणि वैयक्तिक विकासावरील सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस आयुक्त अभिनव गोयल प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, प्रेशर म्हणजेच डायमंड तयार होण्याची प्रक्रिया आहे. जीवनात येणारा दबाव घाबरण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत होण्यासाठी असतो. आपल्या शिक्षक, पालक आणि मित्रांशी संवाद ठेवा, आपल्या भावना शेअर करा. त्यामुळेच खरी प्रगती शक्य होते. भीती हा नैसर्गिक घटक आहे, मात्र तो स्वीकारून मेहनतीद्वारे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनीच त्यावर मात करता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली आवड शोधून त्यावर काम करावे आणि क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी शैक्षणिक अभ्यासासोबत एखादी आवड ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशामागे महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षिका, यांचे विशेष योगदान राहिले. या उपक्रमात शिक्षण अधिकारी भारत बोरनारे, विजय सरकटे यांचे समन्वयामुळे अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित झाला. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात स्टार सीडस् टीममधील सह-संस्थापक ऋुता वऱ्हाडपांडे आणि ऑपरेशन्स हेड कृतिका सपकाळ यांचेही मोलाचे योगदान राहिले.

स्वतःचा मार्ग शोधा
आयुक्तांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, प्रत्येक मार्ग योग्य ठरतो, कारण तो तुमच्यासाठी तयार केलेला असतो. स्वतःचा मार्ग शोधा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करा. याप्रसंगी शेकडो विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतून प्रेरणा घेत आयुष्यात आपले ध्येय निश्चित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com