

धावत्या कारला आग; कार जळून खाक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : कळवा येथून पुण्यातील जुन्नर येथे निघालेल्या धावत्या चारचाकी कारला रेतीबंदर अमित गार्डनजवळ रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी कार जळून खाक झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
कारचालक अरविंड तायडे हे रविवारी सकाळ पुण्याला जाण्यासाठी कारने निघाले. कळवा सोडून मुंब्र्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला रेतीबंदर रोडवर अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच, त्यांनी कार रस्त्याच्या एका बाजूला घेत, कारमधून सुखरूप बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, त्यांनी त्या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत ती कार तसेच कारमधील मोबाईल, पाकीट, पैसे व इतर कागदपत्रे जळून नुकसान झाले आहे. या वेळी दोन रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.