महिला वादक, गायिकांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमी तृप्त

महिला वादक, गायिकांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमी तृप्त

Published on

लता-आशाच्या सुरांनी रंगली कल्याणची संगीतसंध्या
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : लता मंगेशकर, आशा भोसले या नामांकित गायिकांनी अजरामर केलेली गाणी ‘रहे ना रहे हम’ या कार्यक्रमात सादर करून गायिकेने गानरसिकांना तृप्त केले. प्रदीप नायरकृत पद्मावती एंटरटेन्ट आणि अर्चना थिएटर व एकलव्य म्युझिकली मॅड यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी (ता. ९) करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच वादक या महिला होत्या.
उमा देवराज यांच्या संगीत संयोजनाखाली प्रियांका मित्रा, अनहिता श्रीवास्तव आणि इति कार या तीन गायिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील लता मंगेशकर व आशा भोसले यांनी गायिलेली गीते ताकदीने सादर केली. रस्मे उलफत को निभाये, रहे ना रहे हम महेका करेंगे, ना कोई उमंग है, पिया तोसे नैना लागे रे, मेघा छाये आधी रात, आ जाने जा, दैया दैया मे कहां आ फसी, अब जो मिले है तो बाहोको बाहोमे रहने दे ए साजना, खतूबा, राम तेरी गंगा मैली, ये है प्यार की हथकडी ही व अशी विविध गीते ऐकून श्रोते सुखावले. या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. धनश्री सरदेशपांडे यांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com