खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ने पेटवली क्रिकेटची धूम!
खासदार क्रीडा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांपासून युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग
मुंबई, ता. १० : खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकारातून आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’अंतर्गत उत्तर मुंबईत क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांपासून युवक आणि ज्येष्ठ गटांपर्यंतच्या संघांच्या सहभागामुळे मैदानावर उत्साह आणि संघभावनेचा उत्कृष्ट मिलाफ प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
केईएस इंटरनॅशनल टर्फ येथे रविवारी पार पडलेल्या या सामन्यांत २१ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिला गटात साईदर्पण मित्रमंडळ, अंडर-१६ गटात आई एकवीरा ज्युनियर बॉईज, तर वरिष्ठ गटात श्री इलेव्हन संघ विजयी ठरले. शनिवारी सेंट मेरी स्कूल, चारकोप येथे झालेल्या सामन्यांत सहा संघांनी फ्लड लाइट्सखाली खेळ केला. प्रभावी कामगिरी करीत चारकोप कोळी महिला संघ विजेता ठरला. त्याच दिवशी महाराणा प्रताप क्रीडांगण, मालाड येथे पुरुष गटातील स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल १२८ संघांच्या सहभागामुळे हा महोत्सवातील सर्वात मोठा क्रिकेट उपक्रम ठरला. यामध्ये ओंकार बॉईज हे विजेते, दत्त मंदिर बॉईज आणि गजानन बॉईज उपविजेते ठरले. रतननगर मैदान, दहिसर (पूर्व) येथे रविवारी सायंकाळी झालेल्या सामन्यांत राज ११ आणि रतननगर बॉईज या संघांनी विजेतेपद पटकावले. दरम्यान, ठाकूर इंटरनॅशनल टर्फ येथे झालेल्या रोमांचक स्पर्धेत ३० संघांनी सहभाग घेतला. यात साई फोर्स-साईनगर संघाने विजेतेपद मिळवले. या सर्व स्पर्धांमधून उत्तर मुंबईतील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाचे दर्शन घडले.
..
‘फिट इंडिया’चे प्रतिबिंब
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, की ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ हा फक्त क्रीडा उत्सव नसून एकतेचा आणि सामूहिक ऊर्जेचा उत्सव आहे. या उपक्रमाद्वारे आपण आरोग्य, संघभावना आणि स्थानिक क्रीडा प्रतिभेला चालना देण्यात आली. ‘फिट इंडिया’च्या आत्म्याचे हे खरे प्रतिबिंब आहे. उत्तर मुंबईतील नागरिकांचा असा प्रचंड सहभाग पाहून मन आनंदित झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

