मुंबई
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या प्लास्टिक सेफ्टी नेटला आग
इमारतीच्या प्लॅस्टिक सेफ्टी नेटला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : वागळे इस्टेटमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या प्लॅस्टिक सेफ्टी नेटला आग लागल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (ता. ११) घडली असून, या आगीवर पाऊण तासाने नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
वागळे इस्टेट परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या प्लॅस्टिक सेफ्टी नेटला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वागळे इस्टेट पोलिस आणि महावितरणचे कर्मचारी यांनी धाव घेतली. प्लॅस्टिक सेफ्टी नेटला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर पाऊण तासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

