साधूच्या वेशात भामटा;

साधूच्या वेशात भामटा;

Published on

संमोहित करून तरुणाला लुबाडले
साधूच्या वेशातील भामट्यावर गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : कामोठेतील तरुणाला संमोहित करून सव्वा लाखाची हिऱ्यांची अंगठी लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात साधूच्या वेशातील भामट्यावर गुन्हा दाखल आहे.
कामोठेत राहणारा उदय केंद्रे (वय ३०, रा. पार्क हेवन सोसायटी, से.२१, कामोठे) ४ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त सीवूड सेक्टर-४० मधील पोतदार शाळेजवळ गेले होते. या वेळी कारमधून उतरत असताना ३५ ते ४० वयोगटातील जटाधारी, काळ्या कपड्यांतील, रुद्राक्षाच्या माळा, भगवी थैली असलेला अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आली. उदयने १०० रुपयांची नोट साधूला दिली. या वेळी भामट्याने हातचलाखीने नोटेसह रुद्राक्ष, फुल देत उदयचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भामट्याने त्याच्या डाव्या हातातील प्लॅटिनमची अंगठी मागून घेतली. त्यावर विश्वास बसल्यानंतर संमोहित करताना उजव्या हातातील सव्वा लाखाची सोन्याची अंगठी काढून घेतली होती. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
----------------------------
श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक
एनआरआय पोलिसांनी साधूच्या वेशातील भामट्यांचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपीचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्रद्धेचा आव आणून संमोहनाच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीमुळे काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com