बालदिन
११ वर्षांच्या हृदयाने केला मोरशीचा भैरवगड सर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : बालदिनाच्या निमित्ताने हृदया अमित चव्हाण (वय ११) हिने ठाणे जिल्ह्यातील आव्हानात्मक मोरशी भैरवगड सर केला. माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगेपासून वेगळा दिसणारा भैरवगड किल्ला ताठ खडक, अरुंद वाटा आणि उभी चढाई यामुळे अत्यंत कठीण मानला जातो. मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावाशेजारी असलेल्या या किल्ल्याचा वापर पूर्वी टेहळणीसाठी होत असावा, अशी ऐतिहासिक नोंद सांगते. या दुर्गम आणि आव्हानात्मक मार्गावर हृद्याने आपल्या वडिलांसह, मित्र अभिजित पाटील आणि संकेत वरळीकर यांच्या सोबतीने तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सुरक्षा साधनांसह मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
हृदया पाचगणीतील संजिवन स्कूलमध्ये सहावीमध्ये शिकत असून आजवर तिने ५५ किल्ले सर केले आहेत. कलावंतीण, प्रबळगड, राजगड, रायगड, तोरणा, घनगड आणि इरशाळगड यांसारख्या कठीण किल्ल्यांना तिने दिलेला यशस्वी डोंगरमार्ग तिच्या चिकाटीचे प्रतीक मानले जाते. या मोहिमेचे आयोजन कमलू पोकळे आणि वैभव ऐवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे आणि योग्य सुरक्षा व्यवस्थेमुळे मोहीम सुरळीत पार पडली.
‘हृदयाने इतक्या लहान वयात भैरवगड सर केला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मुलांनी निसर्गात जाऊन आव्हानांचा सामना करावा, धैर्याने जीवन जगावे; हीच बालदिनाची खरी शिकवण आहे,’ असे तिचे वडील अमित चव्हाण यांनी सांगितले.
.........
‘पालकांनी मुलांना घेऊन गड-किल्ले फिरावेत, साहसाचा अनुभव द्यावा आणि महाराष्ट्राचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा,’ असे मत संकेत वरळीकर यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

