रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत

रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत

Published on

ठाण्यात रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत
खासदार नरेश म्हस्के यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १४ : शहरातील व घोडबंदर मार्गावर प्रमुख समस्या रस्त्यांची असून, खड्डे, पॅचवर्कचे उंचवटे यामुळे अपघात होत आहेत. उड्डाणपुलावरील रस्त्याची स्थिती चांगली नाही. त्यावर तत्काळ उपाय करण्यासह एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी ही दुरुस्तीची कामे तातडीने, १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार म्हस्के यांनी या बैठकीत दिले. घोडबंदररोड परिसरातील समस्यांवर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
घोडबंदर रोड आणि परिसरातील विविध समस्या आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालय येथील कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्यासह ठाणे महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, प्रादेशिक परिवहन विभाग यांचे अधिकारी, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेचे प्रतिनिधी, घोडबंदर रोड परिसरातील गृहसंकुलांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. घोडबंडर रोड आणि इतर रस्त्याचा स्वीकार करण्यास महापालिका तयार आहे, मात्र हस्तांतरणापूर्वी, सध्या या रस्त्याचा ताबा ज्या यंत्रणांकडे आहे, त्यांनी ते रस्ते सुस्थित आणून ठेवावेत. मगच महापालिका त्यांचा ताबा घेईल, असे या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. वाहतूक, रिक्षा आदींबाबत काहीही तक्रारी असतील, तर त्या नागरिकांनी महाट्र्रॅफिक या पोलिसांच्या ॲपवर नोंदवा, असे आवाहन या वेळी पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी केले.
जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेच्या प्रतिनिधींनी तसेच परिसरातील नागरिकांनी घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी आदींबाबत विविध समस्या आणि सूचना मांडल्या. माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी साकेत ते गायमुख या कोस्टल रोडचा गायुमख ते फाउंटन-वर्सोवा इथपर्यंत विस्तार करण्याची सूचना मांडली. तसेच, ओवळा-मोघरपाडा हा अंतर्गत रस्ता विकसित केल्यास त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

............................

* घोडबंदरवरील अवजड वाहनांचा भार होणार कमी

दिल्ली- मुंबई फ्रेट कॉरिडॉरचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे कंटेनरचा ३० ते ३५ टक्के भार त्या मार्गावर जाणार आहे. तसेच, खानिवडे ते आमणे येथील मिसिंग लिंक जोडल्यास घोडबंदर रोडवरील आणखी भार कमी होणार आहे. त्यासाठी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाकडे पाठपुरावा करीत आहे. हा विषय जलद मार्गी लागावा यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही या बैठकीत खासदार म्हस्के यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com