पनवेलच्या रोणालला रौप्यपदक
पनवेलच्या रोणालला रौप्यपदक
नवीन पनवेल, ता. २० (बातमीदार) ः पंजाब येथील १६व्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघातील रोणाल पाटीलने रौप्यपदक पटकावले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक करताना सत्कार केला आहे.
रोणाल हा युनायटेड शोटोकान कराटे असोसिएशन इंडिया (नीलेश फायटर) अकॅडमीमध्ये प्रशिक्षक योगेश बैकर यांच्याकडून बॉक्सिंगचे धडे घेत आहे. अमृतसर येथील देशभरातील मातब्बर खेळाडूंमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आहे. ३० किलो वजनी गटात रोणालने जिद्द, कौशल्य आणि अचूक तंत्रामुळे रौप्यपदक पटकावले होते. रोणालची मेहनत, चिकाटी आणि क्रीडाप्रती असलेली निष्ठेमुळेच राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश पनवेलसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील तिच्या कामगिरीचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

