बहुद्देशीय बॅग ची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
बहुउद्देशीय ‘बॅग’ची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
तुर्भे, ता. २० (बातमीदार) ः नवी मुंबईतील श्री दत्त विद्यामंदिर प्राथमिक शाळा क्र. १८ आणि माध्यमिक शाळा क्र. ११६ सानपाडा शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी इलेश राजू माला याने बनवलेली बहुउद्देशीय बॅग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या बॅगची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
साकेत महाविद्यालय, कल्याण येथे प्रेरणा पुरस्कार मानक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात या बॅगने सर्वांचे लक्ष वेधले. ही बॅग केवळ साधी बॅग नसून, ती अनेक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. प्रवासात मोबाईल चार्ज करण्यासाठी बॅगमध्ये सोलर यंत्रणा बसवली आहे. बॅग चोरी होण्यापासून किंवा कापण्यापासून वाचवण्यासाठी आतून स्टीलची जाळी आहे. बॅग घेऊन एखादी व्यक्ती हरवल्यास जीपीएसद्वारे तिचा शोध घेता येईल, तसेच दुचाकी चालवताना अपघात झाल्यास जीव वाचवण्यासाठी बॅगेत एअर बॅग बसवण्यात आली आहे.
हा अनोखा प्रकल्प आता गुरुवारी (ता. २७) भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत नवी मुंबईचे प्रतिनिधित्व करेल. इलेशच्या या कल्पकतेबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

