भटक्या श्वानांनी उरणकर बेजार

भटक्या श्वानांनी उरणकर बेजार

Published on

भटक्या श्वानांनी उरणकर बेजार
सात महिन्यांत १,७०५ जणांना चावा; भीतीचे वातावरण
उरण, ता. २२ (वार्ताहर) ः शहरासह तालुक्यात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या श्वानांच्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून एप्रिल, ऑक्टोबर सात महिन्यांच्या कालावधीत उरण ग्रामीण रुग्णालयात १,७०५ जणांची श्वानदंशाची नोंद आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, शाळा-महाविद्यालयांच्या मार्गांवर तसेच वसाहतींमध्ये भटक्या श्वानांच्या टोळ्या वावरत आहेत. अन्नाच्या शोधात किंवा टोळीने श्वान अनेकदा नागरिकांवर अचानक हल्ला करतात. काही ठिकाणी श्वानांकडून दुचाकीचालकांवर हल्ले केले जात आहेत. या श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी न्यायालयाने शासनाला स्थानिक पातळीवरील पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामध्ये लहान मुले, महिला, वृद्ध अशा सर्वच गटांतील नागरिकांचा समावेश आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; पण कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने उरण नगरपालिकेविरोधात संतापाचे वातावरण आहे.
--------------------------------
जनजागृतीचा अभाव
श्वान पकड मोहीम, नसबंदी कार्यक्रम गतीने राबवणे, कचरा व्यवस्थापन सुधारून श्वानांना उपलब्ध होणारे अन्न कमी करणे, जनजागृती करणे अशा उपाययोजनांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. नगर परिषद, पंचायत समिती पशुधन विभाग, ग्रामपंचायत यांनी हस्तक्षेप करून तत्काळ पावले उचलली नाहीत तर पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
-----------------------
वर्ष श्वानदंशाची घटना
एप्रिल २०२४ - ४,४४२
एप्रिल २०२५ - १,७०५
------------------------------------
श्वान निर्बीजीकरणासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी लवकरच एक संस्था नेमून त्यांना काम देणार आहोत. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- एस. एम. भोजने, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, उरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com