बीएसयूपी''तील ८११ कुटुंबांना दिलासा

बीएसयूपी''तील ८११ कुटुंबांना दिलासा

Published on

बीएसयूपीतील ८११ कुटुंबांना दिलासा
सदनिकांची दीड लाखांची नोंदणी रक्कम १०० रुपयांवर
ठाणे, ता. २० ः ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील बीएसयूपी आणि शहर पुनर्विकास प्रकल्पाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे ८११ कुटुंबांच्या सदनिकांचा करारनामा (रजिस्ट्रेशन) अखेर पाच वर्षांनंतर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने या करारनाम्यासाठी आकारण्यात येणारे दीड लाखांचे मुद्रांक शुल्क कमी करून ते फक्त १०० रुपयांवर आणण्यास मंजुरी दिली आहे, ज्यामुळे करारनाम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम आणि बीएसयूपी योजनेंतर्गत कोपरी येथे सहा इमारती उभारण्यात आल्या, ज्यात ८११ कुटुंबे राहतात. रहिवाशांना २०२० मध्ये घरांचा ताबा मिळाल्यानंतर दस्त नोंदणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे विनंती करण्यात आली होती. त्या वेळी करार नोंदणीसाठी नोंदणी फी आणि मालमत्तेच्या मूल्यावरील अधिभार (एलबीटी सेस व मेट्रो सेस) भरावा लागणार होता.
यामुळे सदनिकांचा करारनामा करण्यासाठी नागरिकांना किमान एक ते दीड लाख रुपये खर्च येणार होता. या सदनिकांमध्ये मुख्यतः घरेलू कामगार, मजूर आणि रिक्षा चालवणारे नागरिक राहत असल्याने त्यांना हा मोठा भुर्दंड परवडणारा नव्हता.

पाठपुराव्याला यश
भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजयुमोचे प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांनी या प्रश्नावर महापालिका आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. भाजपचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्याकडेही या प्रश्नी दाद मागण्यात आली होती. अखेर पाच वर्षांच्या संघर्षानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने आदेश जारी करून वाढलेले मुद्रांक शुल्क १०० रुपयांपर्यंत कमी केले.

दस्तऐवजीकरण सुरू
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असून, जिल्हा दुय्यम निबंधकांकडे करारनामा व नोंदणी करण्यासाठी समाजविकास अधिकारी दशरथ वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप लेले यांच्यासह बीएसयूपी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com