नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत निश्चित

नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत निश्चित

Published on

नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत निश्चित
अंतिम दिवशी २२ जणांची माघार; चुरस कायम
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर ४९ जागांच्या २४ पॅनेलमध्ये एकूण १३९ उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावण्यासाठी रिंगणात ठाम उभे आहेत.

१७ नोव्हेंबरपर्यंत एकूण १६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी (ता. २१) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २२ उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्यांमध्ये २० अपक्ष उमेदवार असून, उर्वरित दोन उमेदवार भाजप आणि महाविकास आघाडीचे आहेत.

नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या पाच उमेदवारांपैकी कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे ही लढत अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. बदलापूर नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजप-राष्ट्रवादीकडून रुचिता घोरपडे, महाविकास आघाडीकडून प्रिया गवळी, ‘आप’कडून आस्था मांजरेकर आणि अपक्ष म्हणून (मनसे शहराध्यक्ष) संगीता चेंदवणकर यांनी अर्ज भरला होता. मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने नगराध्यक्षपदाच्या लढतीला वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे राहिले आहे.

मतदारांमध्ये उत्सुकतेचा उच्चांक
चेंदवणकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे बदलापूरमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी स्पष्ट चौरंगी लढत होणार आहे. भाजपा (रुचिता घोरपडे), महाविकास आघाडी (प्रिया गवळी), शिवसेना शिंदे गट (वीणा म्हात्रे), अपक्ष (संगीता चेंदवणकर) यांच्यात लढत होणार आहे. राजकीय वातावरण तापले असून शहरातील मतदारांमध्ये उत्सुकता ताणली आहे. कोणत्या पॅनेलचे पत्ते खुलणार आणि नगराध्यक्षपदाचा मान कुणाच्या पदरी पडणार, याची चर्चा बदलापुरात चांगलीच रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com