अनधिकृत बांधकामांवर आमदारांचा थेट इशारा

अनधिकृत बांधकामांवर आमदारांचा थेट इशारा

Published on

अनधिकृत बांधकामांवर निवडणुकीनंतर धडक कारवाई
आमदारांचा थेट इशारा ः अनधिकृत इमारती पाडण्याचा घेणार निर्णय
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) ः वांगणी ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत चाळ बांधकामांचा सुळसुळाट सुरू असून, ही बांधकामे ग्रामपंचायत, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कथित आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. याप्रकरणी ‘सकाळ’ वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाल्यावर स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ हे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले असून, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या बांधकामांवर कठोर कारवाई करून ठोस निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सुर्योदयनगर भागात गट नंबर १३८ मधल्या प्लॉट्सवर वने कायदा लागू झाल्यामुळे, चाळ आणि इमारत बांधकामास पूर्णपणे बंदी आहे. असे असताना नियम धाब्यावर बसवून काही चाळ माफिया बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे करीत आहे. याबाबत सुर्योदयनगरच्या रहिवासांनी काही दिवसांपूर्वी अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी, बदलापूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी धारवणे आणि वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणीदेखील केली होती. मात्र, १० दिवस उलटूनही हे बांधकाम थांबलेलं नाही. वनाधिकाऱ्यांनी देखील त्यावेळी बांधकाम बंद ठेवण्यासाठी तोंडी आदेश देण्याखेरीच कोणतीही कारवाई केलेली नाही. कारवाईबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता, आपण ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहोत, असे उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी धारावणे यांनी उत्तर दिले. मात्र, ठोस कारवाई मात्र झाली नाही. त्यामुळे वांगणीमधील रहिवासी चिंता व्यक्त करत आहेत.

तत्काळ बांधकाम थांबवण्याचे निर्देश
अखेर या सगळ्या प्रकरणात स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी दखल घेतली असून, त्यांनी प्रथम हे बांधकाम थांबवण्याच्या सूचना देत, आत्तापर्यंत केलेले बांधकाम कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांचं कार्यक्रम पार पडल्यानंतर ते स्वतः हे बांधकाम पाडून पुन्हा भविष्यात अनधिकृत बांधकामे बांधली जाऊ नयेत या संदर्भात कठोर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी बदलापुरात निवडणुकांच्या प्रचार कार्यक्रमात स्पष्ट केले. त्यामुळे वांगणीत सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com