‘देअरर्स अ घोस्ट इन माय रूम’चे मुंबईत प्रकाशन
‘देअरर्स अ घोस्ट इन माय रूम’चे मुंबईत प्रकाशन
संजॉय के. रॉय यांनी रहस्यांच्या अनुभवांवर मांडले मत
मुंबई, ता. २२ : ज्येष्ठ साहित्यिक व जयपूर साहित्य महोत्सवाचे प्रमुख आयोजक संजॉय के. रॉय यांच्या ‘देअरर्स अ घोस्ट इन माय रूम’चे मुंबईत रॉयल ओपेरा हाउस येथे साहित्यिक, विचारवंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.
प्रकाशन सोहळ्यात शोभा डे यांनी रॉय यांची प्रकट मुलाखत घेतली. यात रॉय यांच्या या पुस्तकातील रहस्य आणि त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आलेल्या अनुभवांचा अगदी मोकळेपणाने त्यांनी उलगडा केला. भारतातील कोलकाता, खजुराहो मंदिरांसह इतर अनेक ठिकाणी त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकातून मांडले आहेत. जगभरात आत्मा, भूत आदींविषयी वैज्ञानिक दृष्टिकाेन वेगळे असले तरी आपल्याला आलेले अनुभव आपण मोकळेपणाने मांडले असल्याचे त्यांनी सांगितले.
राॅय म्हणाले, ‘माझे हे पुस्तक एका बायोग्राफी प्रकारातील आहे. मला आणि पत्नीला आलेले रहस्यमयी अनुभव मी यात मांडले आहेत. आम्ही ज्या प्राचीन ठिकाणी अथवा इतर देशात प्रवास करताना आलेले अनुभव यात आहेत. खजुराहो येथे माझ्या पत्नीला आलेले अनुभव अत्यंत वेगळे होते. त्यात मागील जन्माच्या संदर्भातील काही नाते जुळल्याचे आम्हाला जाणवल्याचे मी मांडले आहे. अनेक ठिकाणी असेच अनुभव येत राहिले. लोक काय म्हणतील यापेक्षा माझ्या मनाला वाटले, जे अनुभव आले ते लिहिले.’
‘प्रत्येक जागेवर आम्हाला काही ऊर्जा जाणवल्या. त्याचे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्टीकरण देता येत नसले तरी ते आमच्यासाठी अभूतपूर्व होते. मेंदूच्या कोनात असलेल्या नेणिवेच्या अनेक बाबी कधीतरी समोर येतात, आपल्याला त्या जाणवतात. ते जाणवले म्हणजेच माझ्या या पुस्तकातील अनुभव आहेत,’ असेही संजाॅय रॉय यांनी सांगितले.
--
जयपूर महोत्सवात
मराठीला स्थान
यंदा जयपूर येथे भरविण्यात येणारा जयपूर साहित्य महोत्सव हा १९वा असून, या वेळी जगभरातील नोबेल विजेत्यांसोबत अनेक नामवंत साहित्यिकांची मांदियाळी असेल. या वेळी पारंपरिक साहित्यासोबत विज्ञान, तंत्रज्ञान आणि विशेषत: एआयवर अनेक प्रकारच्या नवीन साहित्याची भर दिसेल. विविध भाषांतील साहित्यामध्ये या वेळी मराठीसह भारतीय भाषांवर आमचा भर आहे. मराठी प्रकाशकांनीही या वेळी सहभाग नोंदवण्याची तयारी केली असल्याचे संजाॅय यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

