पोटदुखीला निमंत्रण

पोटदुखीला निमंत्रण

Published on

पोटदुखीला निमंत्रण
तळोजा-घोट परिसरात प्रदूषित पाणीपुरवठा
खारघर, ता. २३ (बातमीदार) ः तळोजा-घोटगाव परिसरातील दोन हजार सदनिकांमधील हजारो रहिवाशांना कूपनलिकेतील पाण्याचा वापर करतात; पण या पाण्यामुळे केसगळती, त्वचेचे विकार तसेच पोटदुखीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई ते पेंधर मेट्रो मार्गामुळे घोट गावालगत अनेक विकसकांनी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. पेंधर स्थानकापासून दहा मिनिटांच्या अंतरावर गृह प्रकल्प असल्यामुळे हजारो नागरिकांनी लाखोंचे कर्ज काढून घरे खरेदी केली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पालिका, एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणार असल्याची आश्वासने दिली होती; मात्र सहा वर्षांनंतरही नळाला पाणी आलेले नाही. त्यामुळे रहिवाशांना कूपनलिकांच्या पाण्यामुळे त्वचा, केसगळती, जुलाब, पोटदुखी अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
--------------------------------
सुविधांची वानवा
घोट परिसरातील गृह प्रकल्पांतील मालमत्ताधारकांकडून पालिका मालमत्ता कर वसूल केला जात आहे. पालिका पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण कर आकारत आहे; मात्र परिसरात कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. या ठिकाणी शाळा, आरोग्य सुविधा, रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.
-----------------------------
आर्थिक भुर्दंड
तळोजा-घोट परिसरातील बांधकाम व्यावसायिकांनी पाणी जोडणीसाठी पालिकेकडे पैसे भरले आहेत; पण सध्या गृहसंकुलांमध्ये पाणी शुद्धीकरणाची सेवा दिली आहे; मात्र या पाण्याला पिवळसर रंग असल्यामुळे अंघोळ, कपडे धुण्यासाठी वापर केला जात आहे. तर पिण्यासाठीचे पाणी बाहेरून खरेदी करावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
-------------------------
सदनिका ः ४००
रहिवासी - १,७६८
-----------------------------------
कूपनलिकेच्या पाण्यामुळे केसगळती, त्वचा तसेच पोटदुखीच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पालिका प्रशासनाने समस्या दूर करावी.
- विकास तळेकर, रहिवासी
----------------------
घोटगाव परिसरातील गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना पाणी मिळावे, यासाठी एमआयडीसीकडे व्यवहार सुरू आहे.
- विलास चव्हाण, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com