तब्बल १,३७४ विजेत्यांनी म्हाडाची घरे नाकारली
तब्बल १,३७४ विजेत्यांनी म्हाडाची घरे नाकारली
दोन ठिकाणी विजेते, पसंत न पडल्याचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकत्याच काढलेल्या लाॅटरीवर मुंबई, ठाण्यातील सर्वसामान्यांच्या उड्यावर उड्या पडल्या होत्या. सुमारे पाच हजार घरांसाठी काढलेल्या या लाॅटरीसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज आले होते; मात्र विजेत्या ठरलेल्यांपैकी तब्बल १,३७४ जणांना म्हाडाची घरे नाकारली आहेत. एकाच व्यक्तीला दोन घरे लागणे किंवा घर पसंत न पडणे हे घर नाकारण्यामागचे कारण असल्याचे समोर आले आहे.
म्हाडाने काढलेल्या लाॅटरीमध्ये विजेते ठरलेल्यांना घराची स्वीकृती करण्यासाठी ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये घर स्वीकारणे किंवा नाकारणे हे दोन पर्याय असतात. त्यानुसार ४,५२३ जणांपैकी २,१७६ जणांनी घर स्वीकारत असल्याचा पर्याय निवडला आहे, तर एकाच अर्जदाराला दोन किंवा त्याहून अधिक घरे लागणे, घर पसंत नसणे किंवा अन्य कारणामुळे १,३७४ विजेत्यांनी घर नाकारत असल्याचे ऑनलाइन पर्याय निवडत म्हाडाला कळवले आहे. तसेच ५५५ विजेत्यांनी अद्याप कोणताच पर्याय निवडला नसल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जी घरे नाकारली आहे, ती घरे प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना मिळणार असून त्याबाबतचे प्रथम सूचनापत्र त्यांना लवकरच पाठवले जाणार आहे.
...
स्वीकृतीसाठी मुदतवाढ
म्हाडाची लाॅटरी निघाल्यानंतर संबंधित विजेत्यांनी मुदतीमध्ये ऑनलाइनद्वारे म्हाडाला आपण घर स्वीकारत असल्याचे किंवा नाकारत असल्याचे कळवणे अपेक्षित आहे; मात्र अद्याप ५५५ जणांनी कोणताच पर्याय स्वीकारला नाही. पर्याय स्वीकारण्याची मुदत २८ ऑक्टोबरला संपल्याने संबंधितांना घर स्वीकारता किंवा नाकारता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून स्वीकृतीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाने २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विशाल राठोड यांनी सांगितले. तसेच संबंधित विजेत्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

