ड्रग्सविरोधी लढ्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज : सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण
अमली पदार्थविरोधी लढ्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज : डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण
ठाणे, ता. २३ (बातमीदार) : ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अमली पदार्थविरोधी लढ्यासाठी स्पष्ट व संघटित रणनीतीची आवश्यकता अधोरेखित केली. अपघात, दहशतवाद, अमली पदार्थ आणि दुर्बळ घटकांची सुरक्षा ही आजची चार प्रमुख सामाजिक आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. चव्हाण यांनी १३ ते ३० वयोगटातील तरुण सर्वाधिक ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त केली. त्यांनी नशामुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई, अंमलबजावणी यंत्रणांची मजबुती आणि या लढ्यात समाजाचा सक्रिय सहभाग अशी त्रिसूत्री आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
व्यसनाचा प्रवास हा एक ''सायलेंट बॅटल'' असतो. सुरुवातीला मोफत ड्रग्स, नंतर शेअरिंग आणि त्यानंतर वैयक्तिक वापर या चक्रात तरुण अडकतात, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य ढासळते. पुढे पैशांच्या गरजेपोटी ते चोरी किंवा मोठ्या गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी सांगितले.
डॉ. चव्हाण यांनी ड्रग्स पीडितांना गुन्हेगार न मानता त्यांच्या पुनर्वसनावर भर देण्याचे आवाहन केले. पालकांनी भीती न बाळगता मुलांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत आणि पोलिसांना सहकार्य करावे, असा संदेश त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

