नेस्कोमध्ये बुधवारपासून नॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर

नेस्कोमध्ये बुधवारपासून नॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर

Published on

नेस्कोमध्ये बुधवारपासून
युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने आयोजित नववे इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आहे. या फेअरचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या वेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, माजी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत.
तीनदिवसीय प्रदर्शनात १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी होत असून ३० हजारांपेक्षा अधिक युनिफॉर्म डिझाइन्स आणि १५ हजारापेक्षा अधिक फॅब्रिक इनोव्हेशन्स प्रदर्शित केले जाणार आहे. २०१७ पासून भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनापासून युनिफॉर्म उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या प्रदर्शनात शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, कॉर्पोरेट, स्पोर्ट्सवेअर, वर्कवेअर, फॅब्रिक्स आणि अ‍ॅक्सेसरीज युनिफॉर्मशी संबंधित सर्व वस्तू एकाच छताखाली प्रदर्शित केल्या जाणार असल्याचे एसजीएसए फेअर चेअरमन अजय रंगरेज यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com