मुंबई नेव्ही हाफ मॅरेथॉन उत्साहात

मुंबई नेव्ही हाफ मॅरेथॉन उत्साहात

Published on

मुंबई नेव्ही हाफ मॅरेथॉन उत्साहात
२० हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईच्या रस्त्यांवर रविवारी (ता. २३) आठव्या नेव्ही हाफ मॅरेथॉन २०२५मध्ये देशभरातील धावपटूंसह १९ देशांतील ७१ आंतरराष्ट्रीय धावपटूंनी उपस्थिती लावत जल्लोष केला. तब्बल २० हजारांहून अधिक धावपटूंच्या सहभागामुळे ही मॅरेथॉन फिटनेस, एकतेचा भाव आणि देशभक्ती पसरवणारा मुंबईकरांचा खरा क्रीडा उत्सव ठरला.
नेव्ही हाफ मॅरेथॉनमध्ये तीन शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये २१.१ किमी एअरक्राफ्ट कॅरिअर रन, १० किमी डीस्ट्रॉयर रन आणि ५ किमी फ्रिगेट रनचा समावेश होता. या शर्यतींचा शुभारंभ नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी १० किमी रनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. अभिनेते सुनील शेट्टी, अहान शेट्टी आणि रितेश देशमुख यांनी मैदानावर हजेरी लावून धावपटूंना प्रोत्साहन दिले. भारतीय नौदल, इंडियन ऑइल, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई पोलिस, बेस्ट आणि रेल्वे यांनी वाहतूक, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि व्यवस्थापन यासाठी मोठे सहकार्य केले. नेव्ही हाफ मॅरेथॉन हा भारतीय नौदलाचा वार्षिक कार्यक्रम असून २०२६ मधील पुढील मॅरेथॉन नोव्हेंबरच्या तिसऱ्या रविवारी आयोजित केली जाणार आहे.
...
विजेत्यांची चमकदार कामगिरी
पुरुष गट विजेते
कार्तिक कर्केरा - २१.१ किमी
सूरजित के. यू. - १० किमी
आकाश चौहान - ५ किमी
...
महिला गट विजेते
पूजा - २१.१ किमी
सोम्या - १० किमी
गायत्री शिंदे - ५ किमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com