बदली झालेल्या शिक्षिकांचा यथोचित सन्मान; ग्रामस्थांचा भावपूर्ण निरोप
बदली झालेल्या शिक्षिकांचा यथोचित सन्मान; ग्रामस्थांचा भावपूर्ण निरोप
रोहा, ता. २४ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षिकांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. शाळेत उल्लेखनीय सेवा बजावून इतर शाळांमध्ये बदली झालेल्या मुख्याध्यापिका अर्चना हाके आणि सहाय्यक शिक्षिका रुपाली खरात यांना ग्रामस्थांनी यावेळी यथोचित सन्मान करत मनापासून शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही शिक्षिका प्राथमिक शाळा बाहे येथे कार्यरत होत्या. त्यांनी केवळ अध्यापनापुरते कार्य न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नैतिक मूल्ये, स्वच्छता सवयी आणि समाजाभिमुखता निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. गावाशी सलोख्याचे आणि आपुलकीचे नाते निर्माण करून त्यांनी शाळा व ग्रामीण समाज यांच्यात विश्वासाचे नाते दृढ केले होते. बदलीची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी पुढाकार घेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात कुणबी समाजाचे युवा नेते अनंत थिटे, माजी उपसरपंच गणेश पवार, पोलिस पाटील मनोज थिटे, सुनील थिटे, संतोष थिटे, रोशन थिटे, रोशन मोरे, हाके सर, डॉ. प्रितेश मोरे, रोशन ठाकूर, सागर सखपाल, सचिन थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने महिला, युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि आजी-माजी विद्यार्थीही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

