एसटीकडून स्थगित दंड वसुली पुन्हा सुरु
एसटीकडून दंडवसुली पुन्हा सुरू
चालक संतापले
ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाकडून एसटीचालकांच्या पगारातून दंड कपातीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. एसटीच्या बसमध्ये दोष असताना दंडाची वसुली चालकांकडून केली जात असल्याने कर्जबाजारी चालकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. यामुळे आम्ही चूक केली नाही, आम्ही दंड भरणार नाही, अशी ठाम भूमिका चालकांकडून घेतली जाणार आहे.
महामार्गावरील वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीओकडून कॅमेरे बसवले आहेत. या माध्यमातून नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या नियमानुसार एसटीच्या बसवरदेखील कारवाई होते. मात्र चालकाच्या म्हणण्यानुसार बसची गती दाखवणारे स्पीडो मीटर बंद असल्याने गती लक्षात येत नाही. ती एक-दोन अंकाने पुढे जाते. त्याचाही भुर्दंड चालकांना भरावा लागतो. ती चूक एसटीची असल्याने एसटीने तो दंड भरायला हवा. ‘सकाळ’ने दंड प्रकरण लावून धरल्यानंतर एसटी प्रशासनाने त्यास स्थगिती दिली होती; मात्र दिवाळी संपताच पुन्हा दंडवसुली सुरू केली आहे. प्रशासनाच्या या कृत्याने पुन्हा एकदा एसटी बसचालकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
एसटीने आमच्या फरकाची देणी अजून दिलेली नाहीत. ओटीचा हक्कही काढून घेतला. पगार वेळेत होत नाही, तरी दिवाळीत घेतलेली उचल वसूल करणे तत्काळ सुरू केले आहे. आता जो दंड आमच्या चुकीमुळे आला नाही तो आमच्याकडून घेतला जात आहे. आम्ही जगायचे कसे?
- त्रस्त एसटी चालक
ही अन्यायकारक दंडवसुली होऊ नये, यासाठी संघटनेने अगदी परिवहन आयुक्त ते परिवहन मंत्री असा पाठपुरावा केला आहे. मध्यंतरी हा दंड थांबवण्यात आला होता, परंतु आता परत दंड आकारण्याच्या सूचना आल्या आहेत. खरेतर लाँग शीटवर स्पीडोमीटर बंद असल्याच्या नोंदी असूनही दंड होत आहे. सर्वसामान्य जनतेला लोकअदालतीचा फायदा मिळतो; मग एसटी कामगारांनीच काय घोडं मारलंय? तातडीने ही वसुली थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

