केडीएमसीची शून्य कचरा मोहिम कागदारावरच

केडीएमसीची शून्य कचरा मोहिम कागदारावरच

Published on

पालिकेची शून्य कचरा मोहिम कागदारावरच
कल्याण पश्चिमेतील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शून्य कचरा मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम केवळ कागदावरच असून कल्याण पश्चिमेतील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. त्यामुळे आयुक्तांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केला आहे.
कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा, काळा तलाव, शुशुविकास शाळा, ठाणकर पाडा, बीएसएनएल ऑफिस या परिसरात सकाळी कचऱ्याचे साम्राज्य सर्वदूर पसरले होते. पालिका नागरिकांकडून ९५० रुपये कचरा संकलन आणि कचरा वर्गीकरणाचे घेतात. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे यांनी कल्याणमध्ये शून्य कचरा मोहीम राबवत असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रभागात फिरताना सर्वत्र कचरा दिसत असल्याने ही मोहीम कागदावरच आहे. तर, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या या नादुरुस्त असल्याने गॅरेजमध्ये पडून असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांनी ९५० रुपये का द्यायचे, असा सवाल करत आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची मागणी मोहन उगले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com