कोळसेवाडीत दिवसभर वीजपुरवठा खंडित; महावितरणवर नागरिकांचा संताप
कोळसेवाडीत दिवसभर वीजपुरवठा खंडित
महावितरणवर नागरिकांचा संताप
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : कोळसेवाडी परिसरात सोमवारी (ता. २४) सकाळी अकराच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरू होता. संध्याका झाल्यानंतरही वीजसेवा पूर्ववत न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नाना पावशे चौक परिसरातील फिडर शिफ्टिंगच्या कामासाठी हा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती असून, याबाबत बहुतांश नागरिकांना पूर्वकल्पना दिली गेली नव्हती, अशी नाराजी व्यक्त होत होती.
संपूर्ण दिवस विजेअभावी सामान्य नागरिक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. ऑनलाइन कामकाज, गृहउद्योग आणि घरगुती सोयींवर याचा परिणाम दिसून आला. नागरिकांनी महावितरण इतका मोठा कालावधी वीजपुरवठा कसा खंडित करु शकते, असा सवाल उपस्थित केला आहे. जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत यांनी ग्राहकाने वीज बिल न भरल्यास महावितरण तात्काळ कारवाई करते. पण, संपूर्ण दिवसभर पुरवठा खंडित असतानाही वीजमीटरचा चार्ज माफ कसा केला जात नाही? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. दरम्यान, दीर्घकाळ चाललेल्या या पॉवरकटने कोळसेवाडी परिसरातील नागरिक हैराण झाले होते. अखेर संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.
पूर्वसूचनेशिवाय अंधार
कल्याण पूर्वेत ही समस्या ही नेहमीचीच झाली असून महावितरण सहा ते आठ तास पॉवर कट घेते. या पॉवर कटबाबत कोणतीही पूर्वसूचना नागरिकांना दिली जात नसल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. तातडीने आणि नियोजनबद्धपणे वीजसेवा पुनर्संचयित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

