मुंबई विद्यापीठात शिक्षण-मूल्यांकनावर कार्यशाळा
मुंबई विद्यापीठात शिक्षण मूल्यांकनावर कार्यशाळा
मुंबई, ता. २४ : अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्तावर्धन आणि जागतिक मान्यतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ‘एनबीए अवेअरनेस वर्कशॉप ऑन आऊटकम बेस्ड एज्युकेशन अँड ॲक्रेडिटेशन’ (परिणामाधिष्ठित शिक्षण आणि मूल्यांकन) ही एकदिवसीय कार्यशाळा आज मुंबई विद्यापीठात यशस्वीपणे पार पडली. नेशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (एनबीए), तंत्रशिक्षण संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन एनबीएचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जागतिक शिक्षणाच्या बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर जीएपीसी ४.० ही आऊटकम बेस्ड मानांकन प्रक्रियेची महत्त्वपूर्ण पायरी असून, या माध्यमातून शिक्षण संस्थांनी गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्याचे ध्येय ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मानांकन प्रक्रियेमुळे अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती उद्योगसिद्ध व विद्यार्थीकेंद्रित होत असून, जागतिक स्पर्धात्मकतेकडे उच्च शिक्षण संस्थांनी वाटचाल करण्यासाठी एनबीए मानांकन ही अत्यावश्यक आणि दिशादर्शक पायरी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी एनबीएचे सदस्य सचिव डॉ. अनिल कुमार नासा यांनी एनबीए ॲक्रेडिटेशन प्रक्रिया, असेसमेंट मेथडॉलॉजी आणि एनबीएची भविष्यकालीन योजना या विषयांवर सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आयआयटी मद्रासचे माजी संचालक प्रा. सी. आर. मुथुकृष्णन यांनी सहभागी प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मेथड्स ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युशन आणि असेसमेंट टूल्सच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तर एम. एस. रामाया युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, बंगळुरू येथील प्रा. रंगनाथ यांनी सेल्फ असेसमेंट रिपोर्ट तयार करण्याची कार्यपद्धती विशद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

