सेंचुरी मिलची सहा एकर जागा लिलावात काढणार?
सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड लिलावात?
शिवडी, ता. २५ (बातमीदार) : मुंबई महापालिकेने वरळी येथील सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड विक्रीसाठी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा भूखंड सुमारे ४५ ते ५० वर्षांच्या भाडेतत्त्वानंतर महापालिकेच्या ताब्यात आला आहे आणि नव्या धोरणानुसार त्याची विक्री केली जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे गिरणी कामगारवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या गिरणी कामगार कृती समितीच्या बैठकीत, कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी मागणी केली होती, की ‘लॅन्ड सिलिंग ॲक्ट’ अंतर्गत महापालिकेकडे आलेल्या सेंच्युरी मिलचा हा सहा एकर भूखंड गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात यावा. विशेष म्हणजे, या मागणीवर मुख्य सचिवांच्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली होती. असे असतानाही जागा लिलावात काढल्याबद्दल राष्ट्रीय मिल मजूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रश्नावर कामगारवर्गात उठाव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

