सुरक्षा क्रमांकाकडे कानाडोळा

सुरक्षा क्रमांकाकडे कानाडोळा

Published on

सुरक्षा क्रमांकाकडे कानाडोळा
पनवेल शहरातील ४ लाख २३ वाहने रस्त्यावर
पनवेल, ता. २५ (बातमीदार)ः जुन्या वाहनांना सुरक्षा क्रमांक लावण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ४ लाख २३ हजार वाहने अजूनही सुरक्षा क्रमांकाशिवाय धावत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.
शासनाने वाहनांसाठीच्या सुरक्षा क्रमांकाची मुदत पाच वेळा वाढवून दिली आहे. आता अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे भविष्यात मुदतवाढ मिळणार की, दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होणार आहे. सध्यस्थितीत सुरक्षा क्रमांक नसलेल्या वाहनांची संख्या पाच लाख ३८ हजार एवढी आहे. त्यापैकी १ लाख १४ हजार ८७० वाहनांना नवीन क्रमांक देण्यात आला आहे. यापूर्वी मार्च, एप्रिल जून, ऑगस्ट आणि नोव्हेंबर अशी पाच वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता फक्त दोन दिवस वाहनधारकांच्या हातात आहे.
----------------------------
पाच हजारांचा दंड
सुरक्षा क्रमांक नसलेल्या वाहनांना वायूवेग पथकाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास एक हजारांचा दंडही भरावा लागणार आहे. तर आरक्षित क्रमांक असताना वाहन फिरवल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यांदा पुन्हा भेटल्यास पाच हजार दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी तातडीने सुरक्षा क्रमांक लावण्याचे आवाहन केले आहे.
----------------------
दहा ठिकाणी सुविधा
जुन्या वाहनांना सुरक्षा क्रमांक बसविण्याचे काम दहा संस्थ्यांना देण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांतर्गत क्षेत्रात वाहनांना वाहन क्रमांक देण्याचे काम करणार आहे. पनवेलमध्ये दहा ठिकाणी अशी सुविधा देण्यात आली आहे.
---------------------------
क्रमांक बदलचा इतिहास
नव्वदच्या दशकापूर्वी काळ्या प्लेटवर पांढरे अक्षरे, अंक लिहून सुरक्षाक्रमांक तयार केली जात होती. त्यानंतर दहा वर्षानी वाह क्रमांक काळ्या अक्षरात लिहिण्याचा निर्णय झाला. त्यानंतर रेडिअमचा वापर करण्यात आला.
----------------------------------
सुरक्षा क्रमांक वाहनधारकांसाठी फायद्याचा आहे. राज्य शासनाने पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही बहूतांश वाहनधारकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरनंतर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग दंड आकारणीला सुरवात करणार आहे.
-नीलेश धोटे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com