डहाणूच्या फुगा कारखान्यात आग
डहाणूच्या फुगा कारखान्यात आग;
अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू नगरपरिषद हद्दीतील लोणीपाडा येथील एका फुगा निर्मिती कारखान्यात रविवारी (ता. २३) रात्री अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ झाली. डहाणू नगरपरिषद अग्निशमन दल आणि अदाणी अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही पथकांनी समन्वयाने काम करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारखान्यातील कामगारांची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ आहे. त्यामुळे रात्री ८ वाजता आग लागली तेव्हा कारखान्यात एकही कामगार उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
भविष्य धोक्यात
डहाणूमध्ये एकेकाळी ४० ते ५० फुगा कारखाने कार्यरत होते. या उद्योगामुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळत होता; मात्र तांत्रिक अडचणी, आधुनिक विज्ञानामुळे वाढती यांत्रिक प्रक्रिया आणि उत्पादन खर्चातील बदल यांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक कारखाने बंद पडले. सध्या केवळ आठ ते १० कारखाने शिल्लक राहिले आहेत. या घटनेमुळे आधीच संकटात असलेल्या स्थानिक फुगा उद्योगाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

