कल्याण-डोंबिवली निवडणूक मतदार यादीत घोळ?
कल्याण-डोंबिवली मतदार यादीत घोळ?
मतदार यादीतील नावे दुसऱ्या प्रभागात ः सत्ताधारी पक्षाचीच हरकत
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली पालिका निवडणूक प्रक्रियेला गती आली असून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राजकीय धुळवड रंगली आहे. अशात, प्रभागांचे अंतरिम सीमाकंन होऊन मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात, पॅनलमध्ये असल्याने भाजपाने तीव्र आक्षेप घेतला. भाजपा कल्याण जिल्हा निवडणूक प्रमुख भाजपा नरेंद्र सूर्यवंशी, टिटवाळा भाजपा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक विभाग उपायुक्त समीर भूमकर यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणली.
विरोधी पक्षांनी आतापर्यंत पालिका निवडणूक यादीत घोळ असल्याचा आरोप करत हरकती घेतल्या होत्या. पण, आता सत्ताधारी भाजपनेही याद्यातील नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्याची हरकत घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यादीत मोठ्या प्रमाणावर हेरफेर झाल्याचा आरोप भाजपचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी केला आहे. पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी जाणून-बुजून चुकीचे फेरबदल केले, असा दावा त्यांनी केला आहे.
भाजपला निवडणुकीत अडचणीत हा प्रकार
सूर्यवंशी यांनी सांगितले की, एका प्रभागाच्या सीमेत येणारी हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. ही केवळ चुकून झालेली किंवा अपघाती चूक नसून जाणून-बुजून केलेला गैरप्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी
सर्व चुका तातडीने दुरुस्त कराव्यात. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
पॅनलमधील नावांचा घोळ आणि भौगोलिक अंतर
त्याच बरोबर पॅनल क्रमांक तीनमधील १५ ते १६ हजार नावांचा घोळ झाला आहे. जुना प्रभाग क्रमांक नऊ टिटवाळ्यामध्ये स्थानक परिसर कोणत्याही सीमेवर नसतांना येथील सर्व याद्या पॅनल क्रमांक चार मोहने आटाळीमध्ये टाकल्या आहेत. दोन ते तीन किलोमीटरचे अंतर असतांना देखील या याद्या त्या प्रभागात टाकल्या असल्याचे मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी सांगितले. तर, या घोळामागे विरोधक देखील असण्याची शक्यता भोईर यांनी वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

