रस्ता सुरक्षावर पथ नाट्य स्पर्धा

रस्ता सुरक्षावर पथ नाट्य स्पर्धा

Published on

रस्ता सुरक्षावर पथनाट्य स्पर्धा
वाहतूक विभागाचा जनजागृतीचा उपक्रम
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) ः ठाणे वाहतूक विभागाकडून घेण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा पथनाट्याची अंतिम फेरी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ३ डिसेंबर रोजी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या पथनाट्याच्या स्पर्धेतून निवड झालेल्या विजेत्यांमधून तीन क्रमांक निवडून त्यांना अंतिम विजयी म्हणून घोषित केले जाणार आहे. विजेत्यांना वाहतूक विभागाकडून आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार आहे.
आजच्या युगात केवळ वाहन चालविणाऱ्यांनाच वाहतुकीच्या नियमांचे पालन करायचे असे नव्हे तर रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शालेय स्तरातूनच नव्हे, इतर सर्वच ठिकाणांहून जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने कंबर कसली असून सुरक्षित वाहतूक, सुरक्षित प्रवास आणि सुरक्षित रस्ते ओलांडण्याची जनजागृती हाती घेतली आहे. यासाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकांना वाहतूक नियम, सुरक्षित प्रवासाबाबत जागृती केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात विभागाने सर्व वाहतूक उपविभागात एनसीसी विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य स्पर्धा आयोजित करून १५ पथकातून प्रत्येकी तीन विजेते निवडले होते. आता या १८ विजेत्यांमधून तृतीय, द्वितीय आणि प्रथम असे तीन विजेते निवडले जाणार आहेत. ही अंतिम पथनाट्य स्पर्धा काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ३ डिसेंबर रोजी होणार आहे. रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम या विषयांवर पथनाट्ये सादर केली जाणार आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com