घरात शिरकाव करत मोबाईल हिसकवला;
घरात घुसून मोबाईल चोरणाऱ्याला नागरिकांनी पकडले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : किसननगर क्रमांक दोन परिसरात घरात घुसून मोबाईल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी धाडस दाखवून पकडले आणि त्याला श्रीनगर पोलिसांच्या हवाली केले. चोरट्याने पकडले जाण्याच्या भीतीने पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला जखम झाली आहे. प्रकाश रमेश शिंदे, असे या चोरट्याचे नाव आहे.
किसन नगर नंबर दोन येथील नितीन सिद्धपुरा (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते शनिवारी (ता. २३) घरात मोबाईल बघत असताना अचानक चोरट्याने घरात शिरकाव केला आणि धक्काबुक्की करत मोबाईल घेऊन पळ काढला. या धक्काबुक्कीत नितीन यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला मार लागला. तसेच डाव्या हातावर खरचटले आहे. याचदरम्यान आरडाओरडा करून त्या चोरट्याचा पाठलाग केला असता, स्थानिक लोक जमले. त्या लोकांना पाहून चोरट्याने पहिल्या मजल्यावरून तळ मजल्यावर उडी मारली. त्याचवेळी त्याच्या पायाला मार बसल्याने तो तेथेच बसून राहिला. त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर, दहा हजारांचा मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

