कर्जतमध्ये महायुतीच्या संकल्पनामाचे लोकार्पण
कर्जतमध्ये महायुतीच्या संकल्पनामाचे लोकार्पण
मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रकाशन; विकासकामांच्या जोरावर विजयाचा विश्वास
कर्जत, ता. २५ (बातमीदार) : आगामी कर्जत नगरपरिषद निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या संकल्पनामा व वचननाम्याचे लोकार्पण कर्जत येथील बाळासाहेब भवनमध्ये पार पडले. या कार्यक्रमाचे लोकार्पण राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. स्वाती लाड तसेच सर्व प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. कर्जत शहरात तब्बल ११९ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आमदार थोरवे यांचे कौतुक केले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि नागरी सोयीसुविधा यामध्ये करण्यात आलेल्या कामांमुळे कर्जत शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र येत जनतेपर्यंत विकासाचा संदेश पोहोचवणार असून, संघटित शक्तीच्या जोरावर विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आम्ही केलेली कामेच आमची ओळख आहेत, असे सांगत आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास महायुतीला मिळेल, असा आशावाद मंत्री देसाई यांनी व्यक्त केला.
................
स्थानिक पातळीवर समीकरणे बदलतात
विरोधकांच्या आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले की, राजकारणात स्थानिक पातळीवर समीकरणे बदलत असतात. काही ठिकाणी महायुती होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत होईल, पण आम्ही राज्यस्तरावर महायुती म्हणून एकत्र आहोत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना ठाकरे गटाच्या परिवर्तन विकास आघाडीबाबतही मत व्यक्त केले. तसेच कर्जत तालुक्याच्या नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन क्षमतेचा उल्लेख करत, कर्जतला ‘पर्यटन तालुका’ म्हणून घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली. शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. निवडणूक आचारसंहितेमुळे काही विकासकामांची घोषणा करता येत नसल्याची खंत नेत्यांनी व्यक्त केली, मात्र विकासकामांच्या जोरावरच जनतेशी नाते अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

