

पेण नगरपरिषद निवडणूक :
पेणमध्ये उमेदवारांची चुरशीची लढत
एकाच प्रभागात सहा उमेदवार; दोन बॅलेट युनिट लावण्याचा निर्णय
पेण, ता. २५ (वार्ताहर) ः पेण नगरपरिषद निवडणूक यंदा अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अनेक प्रभागांमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत एकूण १२ प्रभागांमधून थेट नगराध्यक्षांसह २५ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यापैकी ६ नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले असल्यामुळे आता उर्वरित १८ नगरसेवक पदे आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू झाली आहे.
विशेषत्वाने प्रभाग क्रमांक ६-ब मध्ये तब्बल सहा उमेदवार रिंगणात असल्याने या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन बॅलेट युनिट्स बसविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. एका प्रभागात दोन बॅलेट युनिट्स बसवण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेतला जात असून, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या निवडणुकीत शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये भाजप-राष्ट्रवादी महायुती, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, ‘आम्ही पेणकर’ आघाडी, नगर विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरोधात होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पेण नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची नोंद झाली आहे. सध्या नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग ६-ब मध्ये सहा उमेदवार असल्यामुळेच या प्रभागात दोन बॅलेट युनिट्स बसवण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार तानाजी शेजारी यांनी दिली आहे. यामुळे पेण नगरपालिकेची ही निवडणूक केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणेसाठीही मोठे आव्हान ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.