पक्षचिन्हाशिवाय प्रचाराचा धडाका

पक्षचिन्हाशिवाय प्रचाराचा धडाका

Published on

पक्षचिन्हाशिवाय प्रचाराचा धडाका
पक्षातील नाराज उमेदवारांचा भेटीगाठीवर भर
जुईनगर, ता.२५ (बातमीदार): नवी मुंबई पालिका निवडणूक तब्बल दहा वर्षांनी पार पडत आहे. प्रभाग पद्धतीने होणारी पहिलीच निवडणूक असल्याने अनेक जण इच्छुक आहेत. पण आयारामांमुळे तिकिट मिळवण्यात अडचणी येणार असल्याने प्रस्थापितांनी प्रचाराचा धडका सुरू केला आहे.
कोरोनाकाळापासून समाजसेवा करणारे अनेक इच्छुक पालिका निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. गेली दहा वर्ष मतदारांच्या संपर्कात असून आपल्यालाच पसंती असल्याचा विश्वास काहीजण बोलून दाखवत आहेत. पण राजकीय पक्षातील आयाराम-गयारामांमुळे अनेकांचे गणित बिघडले आहे. तर युती, आघाडीची घोषणा नसल्याने संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे पक्षाने तिकीट दिले किंवा नाही दिले तरी ''आता थांबायच नाही, लढायच आहे'' अशी भूमिका इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे. तर पक्षातील बंड रोखण्यासाठी अनेक ठिकाणी दोन तिकिटांवर दावा सांगणाऱ्या इच्छुकांना एका तिकिटावर समाधान मानावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
---------------------------
बैठकांवर भर
आरक्षणाच्या मुद्यावरून न्यायालयाच्या निर्देशाने निवडणूक लांबण्याची शक्यता असल्याने काहींच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम जाहीर होण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची धुरा हाती घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न वेगात सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर बैठकांचा धडाका सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com