ऐरोलीत भाजयुमोची संघटनात्मक बैठक
ऐरोलीत भाजयुमोची संघटनात्मक बैठक
तुर्भे (बातमीदार) : भारतीय जनता युवा मोर्चाची ऐरोली मंडळाची संघटनात्मक बैठक वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत युवा संघटन अधिक सक्षम करण्यासाठी विविध संघटनात्मक निर्णय घेण्यात आले. येणाऱ्या पालिका निवडणुकीत महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी युवा मोर्चाकडून प्रभावी भूमिका बजावली जाईल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप नवी मुंबई महामंत्री माजी नगरसेवक अनंत सुतार, ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील, मंडळ अध्यक्ष राजेश मढवी, समाजसेवक सुदर्शन जिरगे, समाजसेवक शिवाजी खोपडे, युवा मोर्चा ऐरोली मंडळ अध्यक्ष अमर सुतार, चारुदत्त ठाणांबीर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

