अंधेरी पूर्वेत पदपथांवर अतिक्रमण

अंधेरी पूर्वेत पदपथांवर अतिक्रमण

Published on

अंधेरी पूर्वेत पदपथांवर अतिक्रमण
जोगेश्‍वरी, ता. २५ (बातमीदार) ः अंधेरी पूर्वेतील नागरदास क्राॅस रोडवरील मिश्रा कुंज बिल्डिंग क्रमांक तीनला लागून असलेल्या तळमजल्यावरील दुकानांनी सिमेंटच्या गोण्या, ब्लॉक्स, विटा व बांधकाम साहित्य थेट दुकानासमोरील पदपथावर ठेवल्‍याने पादचाऱ्यांची गैरसोय सुरू आहे.
या मार्गावर एसबीआय बँक आणि विविध खासगी कार्यालये आहेत. त्‍यामुळे दिवसरात्र पादचाऱ्यांची वर्दळ असते; मात्र पदपथ बंद असल्‍याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. अंधेरी पूर्वेतील बहुतांश ठिकाणी दुकानदार, विक्रेते हे पदपथाचा गोदामासारखा वापर करतात. जवळच के-पूर्व विभागाचे कार्यालय असतानाही या बेकायदा प्रकाराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. पदपथावरील सर्व साहित्य हटवून दंडात्मक कारवाई करावी आणि हा मार्ग कायमस्वरूपी नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com