शेतकऱ्यांसाठी सर नेस वाडिया फाउंडेशनची उपक्रमशील मदत
डहाणूतील शेतकऱ्यांना मोफत भाजीपाला बियाणे
कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे स्थलांतर रोखून त्यांना शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे कृषी आधारित शाश्वत उपजीविकेच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत मंगळवारी (ता. २५) कासा केंद्र येथे कासा बीट, तवा, चारोटी, महालक्ष्मी, धानिवरी, दह्यले आणि ओसरविरा ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या भाजीपाला बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
सर नेस वाडिया फाउंडेशन आणि डहाणू कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे बियाणे वाटप सुरू आहे. एकूण ४०० शेतकऱ्यांना बियाणे देण्याचे नियोजन असून, आतापर्यंत २७१ शेतकऱ्यांना बियाणे मिळाले आहेत. केवळ बियाणे वाटपच नव्हे, तर कृषी विज्ञान केंद्रातर्फे लागवड, पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाचे मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे. फाउंडेशनचे कर्मचारी नियमितपणे शेतांवर भेटी देऊन पिकांची पाहणी करत आहेत. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील शेतकरी सक्षम होत असून, स्थलांतरास आळा बसण्यास मोठी चालना मिळत आहे. जनरल मॅनेजर कुशाला शेट्टी व त्यांच्या टीमने यासाठी विशेष प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

