मुलावर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

मुलावर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न
Published on

मुलावर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न
सतर्कतेमुळे नऊ वर्षांच्या बालकाचा जीव बचावला

मोखाडा, ता. २५ (बातमीदार) ः गेल्या महिनाभर कुठे ना कुठे बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. वेगवेगळ्या भागांत कोंबड्या, बकऱ्या घरातून फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सोमवारी (ता. २४) बिबट्याने एका तिसरीत शिकणाऱ्या खोच येथील शाळकरी मुलावर हल्ल्याचा प्रयत्न केला; परंतु कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे मुलगा सुखरूप बचावला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मोखाडा तालुक्यात बिबट्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अनेक गावपाड्यांत त्याने बकऱ्या, कोंबड्या, कुत्रे फस्त केले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावर एका दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या घटना ताज्या असताना, सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिंपळपाडा येथील संकेत सुनील भोये (वय नऊ) हा सकाळी सहा वाजता शेकोटी पेटवण्यासाठी घराच्या कोपऱ्यात येऊन बसला होता. त्याला पाहताक्षणीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणातून उडी मारून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु दारात बसलेल्या आजी व कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व मुलागा सुखरूप बचावला आहे; मात्र या घटनेने गेल्या काही दिवसांपासून पशूंवर हल्ला करणाऱ्या बिबट्याची मजल आता माणसांवर हल्ला करण्यापर्यंत येऊन ठेपल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी जाऊन पाहणी करून पुढील कार्यवाही तातडीने करणार असल्याचे वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनी सांगितले आहे.
---
फोटो ओळ
बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रयत्नात बचावलेला संकेत भोये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com