धम्मदीप बुद्ध विहारात वर्षावास सांगता
अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व वार्ड शाखांचा ‘वर्षावास सांगता समारंभ’ रविवारी अंबरनाथ (पूर्व) येथील धम्मदीप बुद्ध विहारात झाला. ठाणे जिल्हा पुरुष कमिटीचे अध्यक्ष विजय गायकवाड, महिला कमिटीच्या अध्यक्षा शिला तायडे, भन्तेजी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष औचित्य लाभले. मार्गदर्शनपर भाषणात विजय गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाची प्रकाशकिरणे दाखवत, आपण तन, मन, धनाने एकजुटीने संघटनासाठी कार्य केले पाहिजे, असे आवाहन केले. तसेच प्रत्येक शाखेत २४ प्रकारची शिबिरे आणि अधिकाधिक शाखा वाढवण्याचा सल्ला देत संघटन विस्ताराच्या दिशेने मार्गदर्शन केले. समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंबरनाथ तालुक्यातील सर्व वार्ड शाखांचे अध्यक्ष, सरचिटणीस, वर्षावास मालिका प्रवचनकार, आयोजक, ज्येष्ठ बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि दात्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गौतम मोहिते, अंकिता भोईर, माधवी ढसाळ, आरती कांबळे, बाळासाहेब कांबळे, निर्मला घेगडमल यांसह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे बौद्ध समाजातील एकजूट आणि संघटनशीलतेचा उत्तम प्रत्यय पाहायला मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

