नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाच्या तयारीला वेग

नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाच्या तयारीला वेग

Published on

नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाच्या तयारीला वेग
जर्मन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयकाऊ या गाइडलाइन्सने सराव सुरू
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ ः नाताळ सणाच्या दिवशी २५ डिसेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून पहिल्या विमानाचे उड्डाण होणार आहे. त्या अनुषंगाने एनएमएआयएएल व्यवस्थापनाने उड्डाणविषयक खबरदारी आणि तयारी सुरू केली आहे. जर्मनीहून आलेल्या वैमानिक आणि विमानतळ व्यवस्थापनाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी उतरल्यापासून सामानापर्यंत सराव सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियमांनुसार ऑपरेशनल रेडीन्स एंड एअरपोर्ट ट्रान्सफर काम वेगाने सुरू आहे. हे सर्व कामकाज आयकाऊ या गाइडलाइन्सनुसार विमानतळ व्यवस्थापनामार्फत केले जाते. जर्मनीतील म्युनिक एअरपोर्ट येथील तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून सुरक्षा तपासण्याचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. याकरिता राज्य आणि केंद्रातील सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
--
रंगीत तालीम
विमानतळ रनवेवर उतरल्यानंतर जेव्हा विमानातून प्रवासी बाहेर येतात. त्यानंतर ते सर्व सामानाच्या पट्ट्यावर जातात. याची रंगीत तालीम केली जात आहे. विमानतळच्या प्रवासी, अंतर्गमन, बाह्यगमन या भागात सर्व अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली असून त्या प्रणालीचे कामकाज चालू करून तपासले जात आहे. विमानाची धावपट्टी आणि टॅक्सी वे अनेक वेळा तपासले जात आहेत. विमान ज्या यांत्रिक शिड्यांना जोडले जाते, त्यांचेदेखील परीक्षण सुरू केले आहे. सामान यंत्रणा ऑनलाइन सुरू आहेत की नाही, ते तपासले जात आहेत. स्क्रॅनर सुरू आहेत की नाहीत, ते तपासले जात आहेत. अरायव्हल, चेक इन, सिक्युरिटी होल्ड, ड्युटी फ्री, दुकाने या मार्गाने काढून प्रवेशद्वारापर्यंत प्रवाशांना आणणार कसे, हे पाहिले जात आहे.
-----------------------------
सामान वाहतूक सुरू होणार
२५ डिसेंबरपासून प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतूकदेखील सुरू होणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या पनवेलबाजूला कार्गो गोदामाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. त्याकरिता जोडरस्ता तयार नसल्याने विमानतळाच्या प्रवेशद्वारामार्गे सामानाची ने-आण करण्यासाठी व्यवस्थापन विचारात असल्याचे समजते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com