प्रसुत महिलेला अर्ध्या रस्त्यात सोडणाऱ्या चालकाची सेवा समाप्त.
रुग्णवाहिकाचालकाची सेवा समाप्त
प्रसूत महिलेला रस्त्यात सोडले; वैद्यकीय अधीक्षकांकडून कारवाई
मोखाडा, ता. २५ (बातमीदार) ः मोखाड्यातील आमला येथील सविता बांबरे या प्रसूत महिलेला, रुग्णवाहिकाचालक अतिश मुकणे याने अर्ध्या रस्त्यातच जंगलात सोडले होते. या घटनेच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनी आणि तिच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेला संतापाची दखल घेण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या तोंडी आदेशानुसार, जव्हार कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी रोजंदारीवरचा चालक अतिश मुकणे याच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
----
व्हिडिओ व्हायरल
मोखाड्यातील सविता बांबरे या जव्हार कुटीर रुग्णालयात बुधवारी (ता. १९) प्रसूत झाल्या होत्या. त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले. त्यांना रविवारी (ता. २३) घरी सोडण्यात आले; मात्र रुग्णवाहिकाचालक अतिश मुकणे याने सविताला गावात न सोडता गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मागेच जंगलात सोडले. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. तसेच सविताच्या नातेवाइकांनीदेखील या घटनेवर संताप व्यक्त केला.
--
कर्तव्यात कसूर
अखेर या घटनेची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाच्या तोंडी आदेशानुसार, जव्हार कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय कावळे यांनी कर्तव्यात कसूर व बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवून रोजंदारीवर कार्यरत असलेला रुग्णवाहिकाचालक अतिश मुकणेवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

