वाहतूक कोंडीचा संमेलनाध्यक्षांना फटका
वाहतूक कोंडीचा संमेलनाध्यक्षांना फटका
डोंबिवलीतील कार्यक्रमाला विश्वास पाटील दोन तास उशिरा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः कल्याण-शिळ मार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या कोंडीचा फटका आता ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनाही बसला. विविध ठिकाणी कोंडीत अडकल्याने ते डोंबिवलीतील नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला दोन तास उशिरा पोहोचले.
महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखा आणि ‘डोंबिवली-एक सांस्कृतिक परिवार’ यांच्या वतीने शहरातील विविध दहा सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने साहित्य संमेलनाध्यक्षांचा सोमवारी (ता. २४) डोंबिवलीत नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ७ वाजल्याची असतानाही, वाहतूक कोंडीमुळे ते रात्री ९च्या नंतर कार्यक्रमस्थळी पोहोचले. या वेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, साहित्य डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, कार्यवाह उमा आवटे-पुजारी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कापसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच, वाहतूक कोंडीमुळे येण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट केले. वाटेत लागलेल्या वाहन कोंडीमुळे प्रवास अत्यंत कठीण झाला, तरीही साहित्यनगरी डोंबिवलीत माझा सन्मान होत आहे, याचा आनंद आहे. एवढा उशीर होऊनही तुम्ही तिष्ठत बसलात, हा मराठी भाषेवरील तुमचा प्रेमभाव आणि अभिमान आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
------
मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे!
मराठी ही आपली आईच आहे. भविष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर मातृभाषेतील शिक्षणाला पर्याय नाही. बालपणापासून मराठीची रुजवण व्हावी म्हणून मराठीतूनच शिक्षण मिळाले पाहिजे. शाळांवर पटसंख्येची बंधने येता कामा नयेत. अशी बंधने असती, तर आम्हाला जिल्हा परिषद शाळेत मातृभाषेतून शिक्षण घेता आले नसते, असे सांगत पाटील यांनी मराठीतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

