महापालिका अभ्यासिका केंद्रात ४०० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
अभ्यासिका केंद्रात ४०० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ!
वसईत आसनव्यवस्था वाढवल्याने परीक्षार्थींत समाधान
वसई ता. २५ ( बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी अभ्यासिका केंद्रे उभारली आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन, वसई पश्चिम येथील डॉ. हेगडेवार सार्वजनिक वाचनालयातील अभ्यासिका केंद्रात आता आसनव्यवस्था वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या नवीन सुविधेमुळे एकूण ४०० विद्यार्थी स्वतंत्रपणे अभ्यास करू शकणार आहेत.
सध्या अस्तित्वात असलेल्या आसनव्यवस्थेत नव्याने १४६ आसनांची भर पडणार आहे. यामुळे यूपीएससी, एमपीएससी, इंजिनिअरिंग, सीए, नीट, जी अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अभ्यासिका केंद्रातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत.
माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर नारायण मानकर यांनी आसनव्यवस्था वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार प्रशासनाने त्वरित निर्णय घेत आसनव्यवस्था आणि दुरुस्तीच्या कामांसाठी २८ लाख रुपयांचे काम हाती घेतले आहे.
या अभ्यासिका केंद्रात चार्जिंग पॉईंट, वाय-फाय आणि इंटरनेटची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरच्या घरी अभ्यासासाठी एकांत न मिळणे किंवा पुस्तकांचा अभाव अशा अडचणींवर मात करत वसई-विरार महापालिकेने सुरू केलेल्या या केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे. नव्याने उपलब्ध होणाऱ्या स्वतंत्र आसनांमुळे विद्यार्थ्यांना लवकरच एकांतात अभ्यास करणे सोईचे होणार असून, परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
-----------------------
वसई विरार शहरात ठिकठिकाणी अभ्यासिका केंद्र महापौर असताना सुरु केले त्यामुळे विद्यार्थ्यांना सोईचे झाले तसेच स्वतंत्र आसन व्यवस्था उभारली मात्र विद्यार्थी संख्या वाढत असल्याने आसन अधिक करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली त्याची दखल घेतली गेली व काम सुरु झाले आहे.
नारायण मानकर - माजी महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

