गोळीबारप्रकरणी तीन आरोपी गजाआड

गोळीबारप्रकरणी तीन आरोपी गजाआड

Published on

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : ईमलीपाडा परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक तपास आणि भिवंडीपर्यंत केलेल्या पाठलागातून पोलिसांनी पिस्तूलासह मुख्य आरोपीला पकडत पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील ईमलीपाडा परिसरात २१ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या जीवघेण्या गोळीबाराच्या प्रयत्नाने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सचिन ऊर्फ बाऊजी बहादूर करोतीया (वय ३२) हा आपल्या मित्रांसोबत गोगाजी मंदिराजवळ उभा असताना आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. काही दिवसांपूर्वी फिर्यादी व आरोपी मोहित हिंदूजा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा राग मनात धरून मोहित आणि त्याचे तीन साथीदार ईमलीपाडा येथे आले होते. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हल्ला केला आणि गोळीबार करून मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहता परिसरात गोंधळ उडाला. या गंभीर घटनेनंतर सचिन करोतीया यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले. यातून मोहित हिंदूजा (वय १९), धीरज पारवानी (वय २४), कृष्णा राजपूत (वय १९) या तीन आरोपींची ओळख स्पष्ट झाली. तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने भिवंडी परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. हिंदूजाकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले. अटक झालेल्या आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्याकडे दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com