पालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवावी
प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतीची मुदत वाढवा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यातील बऱ्याच महापालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून, अवघी सात दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे. ती १५ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने केली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला जाहीर झाली असून, या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक संयुक्त पत्र पाठवले आहे. काँग्रेसने विविध आक्षेप घेतले आहेत. अनेक पालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत. बऱ्याच मतदारांची नावे दुसऱ्या भागात गेली आहेत. हरकती घेण्याची पद्धत किचकट व वेळकाढू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

