एमबीबीएसच्या १०० टक्के जागांवर प्रवेश
एमबीबीएसचे १०० टक्के प्रवेश
बीडीएसच्या केवळ सात जागा रिक्त; प्रक्रिया पूर्ण
मुंबई, ता. २५ ः राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत एबीबीएसच्या शासकीय चार हजार ९३६ आणि खासगी महाविद्यालयांमधील तीन हजार ५९९ अशा एकूण आठ हजार ५३५ जागांवर १०० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.
राज्यात एमबीबीएसच्या ४२ आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ महाविद्यालयांमध्ये एकूण आठ हजार ५३५ जागा उपलब्ध होत्या. बीडीएसच्या शासकीयच्या पाच आणि खासगी व्यवस्थानापनाच्या २५ महाविद्यालयांमध्ये एकूण दोन हजार ७१८ जागा उपलब्ध होत्या. त्यातील केवळ सात जागांवर यंदा प्रवेश होऊ शकले नाहीत. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्य सीईटी सेलकडून तीन प्रमुख प्रवेश फेऱ्यांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर विविध महाविद्यालयांमध्ये शिल्लक राहिलेल्या जागांच्या प्रवेशासाठी दोन अतिरिक्त फेऱ्यांही राबविण्यात आल्या होत्या. पहिल्या फेरीनंतर शासकीय जागांवर सर्वाधिक प्रवेश झाले होते, तर खासगी महाविद्यालयांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्या अतिरिक्त फेरीदरम्यान मोठ्या प्रमाणात भरल्या गेल्या.
...
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण
वैद्यकीय प्रवेशाच्या एमबीबीएसच्या काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या तक्रारी आल्या होत्या; मात्र त्यासाठी सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेत त्याचे निवारण करण्यात आले. तर डीएस आदी अभ्यासक्रमांसाठी मात्र मुलींच्या मोफत प्रवेशासाठी काही खासगी महाविद्यालयांनी आडकाठी आणली होती. त्याचीही सीईटी सेलने गंभीर दखल घेतल्याने दीडेशहून अधिक मुलींचे महाविद्यालय स्तरावर रखडलेले प्रवेश काही दिवसांत पूर्ण झाले. सीईटी सेलने यासाठी केलेल्या कामकाजाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले.
...
असे झाले प्रवेश
एमबीबीएस
महाविद्यालये एकूण जागा झालेले प्रवेश
शासकीय - ४२ ४,९३६ ४,९३६
खासगी - २३ ३,५९९ ३,५९९
--
बीडीएस
महाविद्यालये एकूण जागा झालेले प्रवेश
शासकीय - ५ ३१८ ३१२ (६ रिक्त)
खासगी - २५ २,४०० २,३९९ (१ रिक्त)
---
एमबीबीएस कटऑफ गुण
एमबीबीएस एससी एसटी ओबीसी एसईबीसी ईडब्ल्यूएस ओपन
शासकीय ६०० ५८१ ५९६ ५८६ ५९३ ६१५
खासगी ४६० ३७१ ५१६ ५०९ --- ५४५
...
बीडीएस कटऑफ गुण
बीडीएस एससी एसटी ओबीसी एसईबीसी ईडब्ल्यूएस ओपन
शासकीय ४२३ ३२६ ४८१ ४७५ ४७५ ५०२
खासगी ३९९ २९९ ४५० ४३१ --- ४७६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

