धैर्य हेमनानीची दुहेरी सुवर्ण कामगिरी
उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : श्री श्री रविशंकर विद्या मंदिर (उल्हासनगर शाखा) येथे चौथीत शिक्षण घेणाऱ्या धैर्य अशोक हेमनानीने राज्यस्तरावर दर्जेदार कामगिरी करत उल्हासनगरचा मान उंचावला आहे. धुळे येथे १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या २३व्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय वुशू चॅम्पियनशिपमध्ये धैर्यने दोन सुवर्ण पदके पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत फ्लेक्सिबल ड्युअल वेपन प्रकारात उत्तुंग कामगिरी करीत धैर्यने प्रथम क्रमांक पटकावला. तर गट सादरीकरणातही प्रभावी कौशल्य दाखवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. अवघ्या चौथीत शिकणाऱ्या या बालपटूने जिद्द, एकाग्रता आणि शिस्त यांच्या जोरावर अनुभवी स्पर्धकांनाही मागे टाकत राज्यस्तरीय मंचावर चमक दाखवली. सिंधु एज्युकेशन सोसायटी संचालित श्री श्री रविशंकर विद्या मंदिराच्या उल्हासनगर शाखेने या यशाचे कौतुक केले आहे. संस्थेचे संचालक नंद जेठानी आणि सचिव रेखा ठाकूर यांनी धैर्यचे अभिनंदन करत आगामी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक, पालक आणि शाळेच्या सहकार्याने मिळवलेले हे यश केवळ शाळेचा नव्हे, तर संपूर्ण उल्हासनगरचा अभिमान ठरत आहे. दुहेरी सुवर्ण कामगिरीमुळे राज्यस्तरावर उल्हासनगरातील युवा खेळाडूंच्या क्षमतेचा ठसा उमटला आहे.
धैर्य हेमनानीने मिळवलेली दुहेरी सुवर्ण कामगिरी ही शाळेसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. इतक्या लहान वयात दाखवलेली त्याची जिद्द, शिस्त आणि कौशल्य प्रेरणादायी आहे. श्री श्री रविशंकर विद्या मंदिरातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी धैर्य एक उत्तम आदर्श ठरला आहे. आम्ही सर्वजण त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
- रेखा ठाकूर, सचिव, सिंधु एज्युकेशन सोसायटी
उल्हासनगर : सब-ज्युनिअर राज्यस्तरीय वुशू चॅम्पियनशिपमध्ये धैर्यने दोन सुवर्णपदके पटकावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

