खारघरमध्ये टॉवरला आग

खारघरमध्ये टॉवरला आग

Published on

खारघर, ता. २५ (बातमीदार) ः खारघर सेक्टर ३५ डी मधील एका या टॉवरमध्ये आग लागली. या आगीमुळे वीजपुरवठा खंडित होऊन लिफ्ट बंद पडली. त्यामुळे घरात अडकलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्तींना खारघर अग्निशमन जवानांनी वेळीच बाहेर काढले.
खारघर सेक्टर ३५ डीमध्ये व्हीयूब पॅराडाइज हा १७ मजली टॉवर आहे. दुपारी टॉवरमधील डक्टमध्ये आग लागल्याचे अग्निशमन जवानांच्या निदर्शनास आले. लिफ्ट बंद पडल्याने अग्निशमन जवानांनी टॉवरमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून आग आटोक्यात आणली. डक्टमध्ये लागलेल्या आगीमुळे टॉवरमधील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com